Posts

Showing posts from June, 2021

युद्ध इथले संपले नाही!

Image
          दुसरे महायुद्ध ! मानवी इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वात भयंकर नरसंहार .75 वर्षे होऊन देखील आजही या युद्धाच्या आठवणी मानवास त्याच्या एकूणच संस्कृतीचा आणि सभ्यतेच्या व्याख्यांचा पुनर्विचार करायला भाग पाडतात.जवळजवळ सहा वर्षे चाललेल्या या जागतिक युद्धात 1945 साली  सोवियत युनियन च्या लाल फौजेने हिटलरच्या फौजांचा पराभव केला ,बर्लिनमध्ये जाऊन राइश्टागवर लाल झेंडा फडकवला आणि जर्मनीने शरणागती पत्करली. आठ मे च्या संध्याकाळी शरणागती दस्तऐवजांवर सह्या झाल्या आणि नऊ मे हा सोवियत युनियनमध्ये विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. 1991मध्ये सोवियत युनियन कोसळले परंतु ही विजयी दिवसाची परंपरा अजून चालू आहे. नाझी वरील  या विजयाला 76 वर्षे पूर्ण झाली आहेत.  आजच्याच दिवशी  बरोबर 80 वर्षांपूर्वी म्हणजे 22 जुन 1941 ला जर्मनीने अचानक रशियावर हल्लाबोल केला व रशिया साठी दुसऱ्या महायुद्धची सुरुवात झाली .  या निमित्ताने हा लेख. सदरच्या लेखाचा उद्देश सोवियत युनियन ची युद्धा मधील भूमिका विशद करणे नाही,तर या युद्धाने सोवियत जनतेला काय दिले किंवा काय हिराव...

पुष्किन : रशियाचं सळसळतं चैतन्य!

Image
       सहा जून -  आज रशियन भाषा दिन.रशियन कवी अलेक्सांद्र पुष्किनची जयंती रशियात व  इतरत्र रशियन भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. १९ व्या शतकातील पहिल्या चार दशकांमध्ये ज्याने काव्य निर्मिती केली त्या पुष्किनला आजही रशियाचा सर्वोत्तम कवी मानला जातो. त्याने असे काय केलं की त्याचा जन्मदिन हा थेट रशियन भाषा दिन म्हणून साजरा केला जातो ? पुष्किनने रशियन साहित्यिक भाषेचा आणि आधुनिक रशियन वांग्मयाचा पाया घातला. ज्या भाषेत जगप्रसिद्ध लेखकांनी स्वतःची साहित्यनिर्मिती केली त्या भाषेला आकार देण्याचं, तिला घडवण्याचं काम पुष्किनने खर्‍या अर्थाने केले म्हणूनच त्याला रशियन साहित्यिक भाषेचा जनक म्हणून गौरविले जाते. काळ कोणताही असो -  झार कालीन रशिया, सोवियत रशिया किंवा आजचा  भांडवली व्यवस्थेतील आधुनिक रशिया- पुष्किन आणि त्याचं काव्य हेे रशियन समाजमनात खोलवर पसरून राहिलं आहे , नाही - पुष्किन हे रशियाचं चैतन्य आहे !!. कदाचित असा एकहीी रशियन सापडणार नाही की ज्याला पुष्किन च्या कुठल्यातरी काव्यपंक्ती तोंडपाठ नसतील. त्यानेे काव्यात लिहिलेल्याा फेरीटेल्सवर तर अख्ख्या र...