Posts

Showing posts from June, 2020

गिरगिट - चेखव

Image
गिरगिट - अंतोन चेखव       नवीन ओव्हरकोट घातलेला पोलीस इन्स्पेक्टर अच्युमेलव्  हातात एक छोटं गाठोडं घेऊन बाजारातील चौकातून जात होता. त्याच्या  मागून त्याचा मदतनीस हवालदार बास्केट घेऊन चालला होता, जे नुकतंच जप्त करून आणलेल्या गुजबेरीजनी काठोकाठ भरलं होतं. त्या चौकात सर्वत्र शांतता होती; तिथं कोणीच नव्हतं. दुकानांची व खानावळांची उघडी दारं जशी भूकवलेल्या नजरा रिकाम्या  ताटाकडे बघतात तशी भकासपणे बाहेरील जगाकडे बघत होती. त्या दुकानांपाशी भिखारीसुद्धा नव्हती, सगळं चिडीचुप !     " चावतोस !! हरामखोर कुठला!" अचानक अच्यूमेलवला ऐकू आलं. "अरे अरे, सोडू नका त्याला, चावायला बंदी आहे आता. धरा! धरा! आ.. आई गं !! मेलो!!"        त्यानंतर कुत्र्याच्या किंकाळण्याचा आवाज ऐकू आला. अच्यूमेलवने आवाजाच्या दिशेने बघितलं. पिचुगीन नामक व्यापाराच्या वखारीतून एक लहान कुत्रं  उडी मारून बाहेर पळत आलं. ते इकडे तिकडे बघत होतं. त्याच्यामागून कडक इस्त्रीचा कॉटनचा शर्ट घातलेला एक माणूस पळत बाहेर आला. त्याच्या जॅकेटची बटणे उघडी होती. तो कुत्र्याच्या मागे ध...

गंमत - अंतोन चेखव

Image
गंमत   ( शुत्चका)   - अंतोन  चेखव           हिवाळ्यातील ती एक लख्ख सुर्यप्रकाशाची  दुपार होती. बर्फवृष्टी जोरात चालूच होती. नादीन्काच्या कुरळ्या केसांची चंदेरी लट तिच्या गालावर वाऱ्यासोबत झुलत होती, तर तिच्या वरच्या ओठावर हिमकणांचा सफेद थर साचला होता. तिने माझ्या खांद्याला धरलं होतं. ज्या उंच टेकडीच्या कड्यावर आम्ही उभे होतो तिथून खाली पायथ्यापर्यँतचा उतार त्रीव्र होता. त्या उतारावर साचलेल्या बर्फात सुर्य अगदी आरश्यात प्रतिबिंबीत झाल्याप्रमाणे चमकत होता. एक छोटी स्लेजगाडी आमच्या जवळ तयार उभी होती.  " नदेझ्दा पित्रोव्हना , चल आपण स्लेजगाडीतून खाली जाऊ!" मी तिला विनंती केली, " केवळ एकदाच ! तुला खात्री देतो, आपल्याला कोणतीही इजा होणार नाही." पण नादीन्का अगोदरच भयभीत झाली होती. तिच्या हिवाळी बुटांपासून टेकडीच्या तळापर्यंत पसरलेला सगळा  बर्फाच्छादित उतार तिला जणूकाही एका मोट्ठ्या भयानक दरीसारखा भासत होता. मी जेव्हा तिला स्लेजगाडीत बसण्यास सुचवलं तेव्हा तर ती खूपच घाबरली. उताराकडे पाहुन  तिने अगदी श्वासच रोखून धरला. पण खरचं, ज...