Posts

Showing posts from May, 2022

चिले सर - एक अवलिया माणूस

Image
  चिले सर - एक अवलिया माणूस        कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीची भेट घेणं टाळतो किंवा पुढे  पुढे ढकलतो आणि एक दिवस आपल्याला समजते की ती व्यक्ती खूपच दूर निघून गेलेली आहे. काही वेळा  व्यक्ती अशा जगात गेलेली असते की जिथून परतणं कुणालाच शक्य झालेलं नाही. अशावेळी आपणाला वाईट तर वाटतच पण स्वतःचा राग देखील येतो. त्या व्यक्तीच्या स्मृती आपल्या मनात घर करून राहतात.       ईकबाल चाचांचं उर्मिला टॉकीज पाशी असलेलं चांद बुक स्टॉल म्हणजे  वाचकांसाठी असलेलं एक प्रकारचं छोटखानी विद्यापीठच म्हणावं  लागेल. कोल्हापुरातील जी हातावर मोजण्याइतकी जुन्या पुस्तकांची बुक स्टॉल आहेत त्यामध्ये या स्टॉलच खुप महत्व आहे.  इथं इंग्रजी आणि मराठी मधील जुन्या कथा कादंबऱ्या, ललित, मासिके  आणि  बऱ्याच प्रकारची इतर पुस्तके देखील मिळतात.  चाच्यांच्या वडिलांपासून हा जुन्या पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. चोखंदळ वाचक इथं हमखास चांगली चांगली पुस्तके मिळवण्यात यशस्वी होतो. सीनियर कॉलेज मध्ये असताना आणि विद्यापीठात मास्टर्स करत असताना  या जुन्य...

आणि मार्क्स रशियात पोहोचतो..

Image
  आणि मार्क्स रशियात पोहोचतो..          आज कार्ल मार्क्स यांची जयंती! ज्या मार्क्‍सच्या विचारांमुळे रशियामध्ये राज्यक्रांती घडून आली तो मार्क्स रशिया मध्ये कसा पोहोचला  याचा किस्सा फार गमतीशीर आहे.📚       रशियामध्ये झारशाहीच्या काळात १९ व्या शतकात कुठल्याही पुस्तकांच्या, साप्ताहिकांच्या, वर्तमानपत्रांच्या प्रकाशनवर सेन्सरचे प्रचंड नियंत्रण असायचे. (याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रशियामध्ये कुठलीही पोलिटिकल स्पेस नव्हती, त्यामुळे रशियाचे लेखक, कवी ,विचारवंत ही पोलिटिकल स्पेस  साहित्यामधून,  कलेमधून भरून काढायचा प्रयत्न करत असत.) मार्च १८७२ मध्ये सेन्सरच्या ऑफिसमध्ये त्यांच्या टेबलावर  पोलिटिकल इकॉनॉमी या विषयावरील  जर्मन भाषेत लिहिलेले  एक जाडजूड पुस्तक येऊन पडलं. त्याचं परीक्षण करून  सेन्सर अधिकाऱ्यांना त्या पुस्तकाचं प्रकाशन करू द्यायचं की नाही हे ठरवायचं होतं.  त्या ग्रंथाचा प्रशियन लेखक  कार्ल मार्क्स  हा  सेन्सरना चांगलाच परीश्रुत होता. त्याच्या समाजवादी सिद्धांतांबद्दल त्याची पूर्वीची ...