Posts

Showing posts from March, 2022

अलेक्सांद्रा कलन्ताई- सोविएत रणरागिनी

Image
  अलेक्सांद्रा कलन्ताई- सोविएत रणरागिनी      काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला गेला. त्याच पार्श्वभूमीवर आज एका रशियन महिलेच्या कार्याबद्दल लिहीत आहे कि ज्यांचं नाव आज आपल्या (तोकड्या) इतिहासाच्या पडद्यामागे गेलं आहे. त्यांची आज (३१ मार्च) १५० वी जयंती आहे. विसाव्या शतकातील कामगार - कम्युनिस्ट चळवळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर रशियन राज्यक्रांती, लेनिन स्टॅलिन इत्यादी नावे पटकन येतात. कम्युनिस्ट चळवळीतील महिला म्हटलं की अगदी मोजक्याच स्त्रियांची नाव आठवतात- रोजा लक्झेंबर्ग, क्लारा जेटकिन, नदेझ्दा कृपस्कया(लेनिन यांच्या पत्नी). सोवियत रशियातील अलेक्सांद्रा कलन्ताई हे नाव तसं कोणाच्या खास परिचयाचे नसेल. नावातच ताई असलेल्या या ताईने विसाव्या शतकातील सुरुवातीस क्रांतीच्या भोवऱ्यात अडकलेल्या रशियात एक वेगळाच इतिहास स्वतःच्या कार्याने घडविला.            जगातील कामगारवर्गाची पहिलीवहिली राज्यक्रांती रशियामध्ये १९१७ मध्ये घडवून आणण्यात  कलन्ताईंचा महत्त्वाचा वाटा होता.  लेनिनच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर १९१७ मध्ये रशियाती...

सोशल मीडिया बद्दल सोसेल तेवढेच केलेले काही विचार

Image
  सोशल मीडिया बद्दल  सोसेल तेवढेच केलेले काही विचार      सोशल मीडिया किती गोंडस नाव वाटते! मला नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे की या माध्यमाला सोशल हे विशेषण कसे बरे जोडले गेले असेल? सोशल रीफॉर्मर किंवा सोशल वर्कर (जुन्या काळातला. आत्ताचा डिजिटल फ्लेक्सवरील नव्हे) या नावांमध्ये असणारा सोशल हे विशेषण व सोशल मीडिया या शब्दातील सोशल हे विशेषण यामध्ये कितपत साम्य असावे. असल्यास त्याची व्याप्ती किती? कारण हा  मुळत: डिजिटल - इंटरनेट मीडिया आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेले हे माध्यम  जे व्यक्तीला  सोशल म्हणजेच सामाजिक बनवण्याच्या प्रक्रियेकडे घेऊन जाण्यापेक्षा त्याला अतार्किक व टोकाचं वैयक्तिक बनवण्याकडे घेऊन जात  असल्याचं चित्र  दिसत आहे. सामाजिक या शब्दात जी कलेक्टीवनेसची, एकमेकात मिसळण्याची, सामावून जाण्याची  अंगभूत भावना आहे ती सोशल मीडिया च्या सोशल मध्ये सापडत नाही. इथं  खास करून माय लाईफ माय रुल्स या उक्तीप्रमाणे कारभार चाललेला दिसतो.       ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो त्याची रुपं असलेले व्हाट्सअप, फेसबुक...