Posts

Showing posts from June, 2025
Image
  जगणं थांबवायचं नाही, वाटा सापडत जातील...     ( २०२२)     गेल्या वर्षी याच दिवशी मला Covid झाल्याचं स्पष्ट झालं. टेस्ट केली आणि ती पॉझिटिव आली. बोरिया बिस्तर गुंडाळून तसाच  आपल्या विद्यापीठाच्या D.O.T च्या बिल्डिंग मध्ये असणाऱ्या Covid सेंटर ला गेलो. दहा दिवस तिथे उपचार घेत होतो. माझा covid तसा माईल्ड स्वरूपाचा होता. पण त्या दहा दिवसां दरम्यान मला मनाला थोडी शांतता लाभली. स्वतःच्या भविष्याबद्दल विचार करण्यासाठी निवांत वेळ मिळाला . त्या दहा दिवसांच्या दरम्यान बराच काळ मला पुढच्या चार-पाच वर्षात माझं आयुष्य कसं असेल हाच प्रश्न सतावत होता. कारण मी ज्या विषयात मास्टर्स करत होतो ते अजून पूर्ण झालं नव्हतं आणि मला भिती वाटत होती की कदाचीत ते पूर्ण होईल की नाही. ज्या प्रोजेक्टवर काम केलं होतं त्याचं देखील माझ्याकडून रेंगाळलं होतं  ते कधी पूर्ण होईल की नाही ही देखील शंका वाटु लागली होती. वैयक्तिक- कौटुंबिक जीवनात देखील बरारासा उलटफेर झाला होता. ज्या कोवीड सेंटरच्या  रूममध्ये छताकडे नजर खिळवुन मी शून्य मनाने तसाच एकटक पाहत राहायचो;बराच वेळ. आयुष्य  ...