Posts

Showing posts from January, 2023

मी आणि विमान!

Image
  जे एन यु कॅम्पस मध्ये आल्यापासून बऱ्याच गोष्टी निरीक्षण करतोय. त्यातील माझ्यासाठी एक मजेशीर गोष्ट म्हणजे मिनिटा मिनिटाला डोक्यावरून  घरघर करत  जाणारी विमानं. अतिशय कमी उंचीवरून जाणारी ही विमान दिवसा खूपच सुंदर वाटतात, पण रात्री यांचा आवाजाचा भलताच त्रास होतो. त्यात म्हणजे लँडिंग चं विमान डायरेक्ट आमच्याच हॉस्टेल वरून जातं. कधी कधी झोपच लागत नाही यांच्या आवाजामुळे. रात्री तीन साडेतीन वाजता जाणार Emirates चं  महाभयंकर कार्गो विमानाचा आवाज ऐकून  भीती वाटते की आता हा सरळ अंगावरच कोसळणार. साखर खाल्लेला माणूस या नाटकामधील मला त्या  प्रशांत दामलेंची आठवण येते. डायबिटीज वर उपचार घेत असता चिडचिड टाळण्यासाठी, शांत वातावरण निर्मिती  करण्यासाठी  घरातील आणि गल्लीतील शांतता भंग करणाऱ्या दंगेखोर घटकांना दरडावून गप्प करु शकता परंतु डोक्यावरून घरघर करून जाणाऱ्या विमानाला काय उपाय करणार? असाच वैताग आला की मला  वाटतं की रात्री गच्चीत जाऊन एखादा दगड भिरकावून द्यावा या विमानांवर😅    दिवसा मात्र या लँडिंग करणाऱ्या विमानांकडे पाहतच बसावं असं वाटतं. लहा...